एमेस एक्सेल मधले सूत्र (फॉर्मुला)

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

एमेस एक्सेल मधले सूत्र (फॉर्मुला)

majhiduniya
मला माझ्या कामाकरता तासांचा कालावधी एमेस एक्सेल च्या =time(hour,min,sec) या पद्धतीत ऑटोमॅटिकली कसा बदलता येईल ? उदा. ११७ मिनिटे ही संख्या १ तास ५६.७५ मिनिटे या पद्धतीत लिहायला =FLOOR(E746/60,1) & " hours" & MOD(E746,60) & " minutes" हे सूत्र वापरते. पण या १ तास ५६.७५ मिनिटाचे =time(1,56,75) करण्याकरता कोणते सूत्र वापरावे ?
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: एमेस एक्सेल मधले सूत्र (फॉर्मुला)

Salil Chaudhary
Administrator
खरे सांगायचे तर मला हा प्रश्नच नीटसा कळला नाही, तरीही मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

दोन वेगवेगळ्या पद्धती वापरुन हा प्रश्न सोडवता येईल.

१. समजा 175 हे input  B2 या सेल मध्ये लिहिले आहे. याचे वेळेमध्ये रुपांतर आपण B3 या सेलमध्ये करुयात.

त्यासाठी B3 मध्ये हा फॉर्म्युला लिहा -  =B2/1440

आणि B3 सेलला सिलेक्ट करुन त्यावर राईट क्लिक करा. आणि Format Cells > Number > Custom येथे [h]:mm:ss हा पर्याय निवडा.

आता 2:55:00 ही वेळ दीसेल.

दुसरा पर्याय मला तुमच्या प्रश्नातच मिळाला. तो असा -

समजा C2 या सेलमध्ये 175 हे input लिहिले आहे. आता खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे तीन सलग (A3,B3,C3)कॉलम्स मध्ये सुत्रे लिहा.

excel time

शेवटच्या म्हणजेच C3 या कॉलममध्ये तुम्हाला 2:55 AM अशी वेळ दीसेल. 
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: एमेस एक्सेल मधले सूत्र (फॉर्मुला)

majhiduniya
धन्यवाद सलील,

तुम्ही दिलेले दोन्ही पर्याय लागू पडत आहेत. मी दिलेले सूत्र असेच महाजालावर शोधताना सापडले होते...पण त्याचाच उपयोग करून मला हवे होते ते आउटपुट कसे मिळवायचे काही कळत नव्हते.

पण पहिल्या पर्यायात */१४४० आहे..ते १४४० कशाकरता ते कळेल का ?

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: एमेस एक्सेल मधले सूत्र (फॉर्मुला)

Salil Chaudhary
Administrator
24 तास * 60 मिनिटे = 1440
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: एमेस एक्सेल मधले सूत्र (फॉर्मुला)

majhiduniya
धन्यवाद,

अशाच पद्धतीने मला आजच्या १८.३४ ते उद्याच्या २०.१८ ( २५.४४ तास ) यामधला कालावधी काढायचा असेल तर काय सूत्र वापरावे लागेल ?