?????? ?????????? ???????????..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

?????? ?????????? ???????????..

Prathmesh Shirsat

माझ्या ह्रदयाच्या हिंदोळ्यावर..आजही मला दिसतेस तू,
लाजून गोड हसताना,
माझ्या हृदयाच्या हिंदोळ्यावर

ओठीचे ते शब्द अबोल तुझे
दिसतात अजूनही तेवढेच बोलके
माझ्या हृदयाच्या हिंदोळ्यावर

बागेर्तले आपण पाहिलेली स्वप्ने
आजही चिरतरुण आहेत गं
माझ्या हृदयाच्या हिंदोळ्यावर

तुला पहिल्यावर मनात
उठणार्‍या नाजूक लहरींचे वादळ अजूनही तसेच
माझ्या हृदयाच्या हिंदोळ्यावर

जवळ आहेस तु माझ्या
तरी दूर का निघून जातेस, तशाच सुप्त आठवणी ठेवून
माझ्या हृदयाच्या हिंदोळ्यावर