संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

classic Classic list List threaded Threaded
23 messages Options
12
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Salil Chaudhary
Administrator
बॉस .....
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
तिला मी बघितले जितुके कुणीही बघितले नाही,
तिला बघणे सुद्धा आता जरुरी राहिले नाही,

तयांनी मोजली माझीच पापे न्याय देताना,
तिलाला हनुवटी वरच्या कुणीही मोजले नाही,

तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना,
तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही,

कशा व्याख्या तयांना समजवू मी धुंद होण्याच्या,
तिला प्रत्यक्ष त्यांनी एकदाही पाहिले नाही,

मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवुनि सारी,
असा झालो फरारी मी पुन्हा मज पाहिले नाही,

असा होतीस माझा शब्द तू आत्म्यातला हलवा,
तुला मी गिरवले होते कधीही मिरवले नाही...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
आडवी उभी इकडून तिकडून सगली एक गोष्टच गोष्ट,
जरा नावे बदलायची अणि बदलायचे एक मुक्काम पोस्ट...!

की अमर असल्यासारखी उभी सगली नावे तोऱ्यात साली,
काना मात्रा मोजत मोजत हट्ट धरत मातीत गेली,
आडवी शिडे, उभी शिडे, वारा भरतो, होडी पळते,
ढग फुटतो, ताम्बड फूटते, कौल फुटतात, दाढ़ी फूटते,
आडवी उभी इकडून तिकडून सगली एक गोष्टच गोष्ट...!

की ताम्बडी रबरी गरम पिशवी, शेक छाती, शेक पोट,
घड्याल वाजत, कुकर तापतो, मांजर पळते, चहा घोट,
उन पडल, उन वाढल, उन चढ़ल, गरम भिंती,
चिकट शरीर, चिकट घाम, चिकट पाल भिंतीवरती,
आडवी उभी इकडून तिकडून सगली एक गोष्टच गोष्ट...!

नळ गळतो, गाडी बंद, चप्पल तुटते, ठेच लागली,
शिन्ख आली, कळ आली, आठवण आली, लाज आली,
धुने ओले दोरीवरती, मळकट कॉलर माजावरती,
पावले वाजली, कधी गेली, कधी थांबली दारावरती,
आडवी उभी इकडून तिकडून सगली एक गोष्टच गोष्ट...!

च्यायला मायाला, नमो नमः, लाळ गळते, अन्न पचत,
कोणी हसत रडत कुडत चिडत, प्रेम चालू भांडण चालू,
पंगती चालू, श्राद्ध चालू,
आत्या काके मामे मावश्या, हाका चालू, नाती चालू,
आडवी उभी इकडून तिकडून सगली एक गोष्टच गोष्ट...!

की पाउस आवडनारे झाले, कोणी डुक्कर, कोणी मोर,
चिवट चर्चा, चिवट देव, चिवट प्रश्न, आम्ही कोण?
चोथा झाला, चोथा चालू, तरी चोचीत पड़ते चोच,
जन्मा आलो, सार्थक झाले, बोम्बला, कळवा साभारपोच,
कळवा काले, कळवा गोरे, कळवा पिवले, नांदत आहेत,
शाईमधून तरत आहेत, पोहत आहेत, बुडत आहेत,
जगत आहेत, तहान पित, पाउस पडेल तेव्हा पडेल,
बाप्पा, आता तुमच बोला, तुमच पोट कधी भरेल?
आडवी उभी इकडून तिकडून सगली एक गोष्टच गोष्ट...!

आडवी उभी इकडून तिकडून सगली एक गोष्टच गोष्ट,
जरा नावे बदलायची अणि बदलायचे एक मुक्काम पोस्ट...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
तिला मी बघितले जितुके कुणीही बघितले नाही,
तिला बघणे सुद्धा आता जरुरी राहिले नाही,

तयांनी मोजली माझीच पापे न्याय देताना,
तिलाला हनुवटी वरच्या कुणीही मोजले नाही,

तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना,
तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही,

कशा व्याख्या तयांना समजवू मी धुंद होण्याच्या,
तिला प्रत्यक्ष त्यांनी एकदाही पाहिले नाही,

मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवुनि सारी,
असा झालो फरारी मी पुन्हा मज पाहिले नाही,

असा होतीस माझा शब्द तू आत्म्यातला हलवा,
तुला मी गिरवले होते कधीही मिरवले नाही...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
उगाचच रातभर जगायला हवे !
सुखासीन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे!.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे !

गाराठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडिलाच वाजायला हवे !
छोटे मोठे दिवे फुन्करिने मालवून
कधीतरी सूर्यावर जळआयाला हवे!.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे !


भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे
उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखडत आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे!.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

विळीपारी कधी एक चंद्रकोर घ्यावी
हिरवीशी स्वप्ने धारे धारेने चिरावी
कोर कोर चन्द्र चन्द्र हरता हरता
मनातून पूर्णबिम्ब त्यागायला हवे !.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे !मनातल्या माकडाशी हात मिळवुन
आचरावे कधीतरी विचार वाचून !
झाडापास झोम्बुनिया हाती येता फळ
सहजपणे तेहि फेकायला हवे !.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे !


कधी राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे !
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळआयला हवे !.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

ढगळआसा कोट , छड़ी , विजार तोडकी
भटक्याची चाल दैवासराखी फेंगडी!
जगण्याला यावी अशी विनोदाची जान
हसताना पापण्यांनी भिजायला हवे !.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे !


तेच तेच पाणी अणि तीच तीच हवा !
आणि तुला बदलही कशासाठी हवा ?
जुनेच अजुन आहे रियाजावाचुन !
गिळलेले अधि सारे पचायला हवे !.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे !


नको बघू पाठीमागे येइल कळून
कितीतरी करायचे गेलेले राहून !
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात
स्वताहलाही कधी माफ़ करायला हवे !.... कधीतरी वेड्यागत वागायला हवे !

- संदीप खरे
 
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो । । .
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन . . .

म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन . . .

येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .

माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .

त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -
" बरं झालं हे झाड आलं !
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
तो प्रवास कसला होता..........
तो प्रवास कसला होता..........

तो प्रवास कसला होता, मी स्वत:स पुसुनी थकलो
तू प्रारंभच ना केला; अन मी अर्ध्यातुन वळलो !

तुजवरी लावला जिव... हे मुळात चुकले माझे
मी पाउस हुडकायाला ग्रिष्माच्या गावा शिरलो !

कधी जनातुनी... कधी विजनी.. कधी नयनी.. मनात अंति !
कधी तुला शोधण्यासाठी बघ कुठवर वनवन फिरलो...

दिनरात धाडली तुजला मी निमंत्रणे कवितांची
पण खरेच आलीस तेव्हा शब्दांच्या मागे दडलो

मेंदिभरल्या हाताने सनईचे वेचीत सुर
तू सुखात रडलीस तेव्हा मी उदास होउन हसलो...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
इतकी नाजुक इतकी अल्लड

इतकी नाजुक इतकी अल्लड फुलपाखराहून अलवार
चालू बघता नकळत होते वाऱ्यावरती अलगद स्वार इतकी नाजुक .......

भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार
लख्ख गोरटी रापून झाली रात्रीत एका सावळी नार इतकी नाजुक ........

इतकी नाजुक जरा निफेनी जोर देऊनी लिहिता नाव
दावित आली दुसऱ्या दिवशी अंगा अंगावर हळवे घाव इतकी नाजुक.......

कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिला
जरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला .......

इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातो
ती गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक .....

इतकी नाजुक की जेव्हा ती पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारण जलात साखर क्षणात विरघळते........

इतकी नाजुक की आता तर स्मरणाचे भय वाटे
नको रुताया फुलास आपुल्या माझ्या जगण्यातील काटे ....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
काय ती करते खुणा

काय ती करते खुणा, अन् काय माझ्या कल्पना...
काय बोले सत्य अणि काय् माझ्या वल्गना....

एकदा ती हासली नी जन्म झाला सार्थ हा...
क्षणभरावर नोंद केवळ, युग भरावर वंचना...

क्रूर हे रस्ते तुझे पण मीही इतका निश्चयी....
टोचत्या काट्यास आता पाय देती सान्त्वना...

त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली..
गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना..

एवढेही तू नको घेउ मनावर शब्द हे...
जा तुला म्हटलो खरा मी, पण् जराशी थांब ना...

गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना....
नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना.....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
पाऊस सोहळा झाला

जंतर मंतर..
जंतर मंतर
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली...
इपरीत खेळ; जरी पुनवेची वेळ काल रानात आमोशा झाली...
पावलं वेंधळी झाली..रातही आंधळी झाली!
इपरीत खेळ; जरी पुनवेची वेळ काल रानात आमोशा झाली...

कडीकपारीत हलत्या डूलत्या भीतीच्या पागोळ्या झाल्या..
पायाखाली काही भलत्या सलत्या सावल्या हालून गेल्या..
मोहाचे फुल गेले घालून भूल काल रानात आमोशा झाली..

उराच्या आतून हुंकारते काही कालवा कालवा झाला..
उघड्या डोळ्याने फुत्कारते काही गारवा जहरी झाला.
दंशाची धार,झाला बोभाटा फार काल रानात आमोशा झाली!

टाकुनिया घाला उतला मातला खजिना लुटून नेला..
चडावला जीव शिणला भागला रावाही उडून गेला..
सरला उपाय सांगू कुणाला काय काल रानात अमोशा झाली..

पावलं वेंधळी झाली,वाटही आंधळी झाली...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
उगाचच काय ग, छोट्या मोठ्या गोष्टिवारून इतके वाद..

उगाचच काय, माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद.
मी, तू , जगणे, पृथ्वी, कोणीच इतके वाईट नाही
आधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा, आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून, डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या, अजून विनामूल्य पडत आहेत

अजून तरी कर नाही, आपले आपण गाण्यावर
‘सा’ अजून ‘सा’ च आहे, ‘रे’ तसाच ऋषभावर

अजून देठी तुटले फूल, खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पॉन्सर केल्यावाचू अजून, चंद्र घाली चांदणभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय, कळी उमलून होते फूल

सागर अजून, गणतीवाचून, लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाऊस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही, त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाही
आणि इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
रे फुलांची रोख किम्मत

रे फुलांची रोख किम्मत करू नए कोणी
गंध मातीचा कुपितून भरू नए कोणी
रे फुलांची रोख किम्मत करू नए कोणी ||ध्रु||

वाट शोधावी,पहावी, वाट भोगावी
गाव आहे दूर म्हणुनी अडू नए कोणी |१|

आस्तिकाला देव नाही म्हणुन नए कोणी
एवढे ही ठार नास्तिक असू नए कोणी |२|

सात फुटक्या घागरितून जन्म हा गळता
थेम्ब त्यातील एक ही दवडू नए कोणी |३|

सर्व मी सोडून जाता प्रार्थना इतुकी
कोपरयावर ओळखीचे दिसू नए कोणी |४|
रे फुलांची रोख किम्मत करू नए कोणी......
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
क्षणात लपून जाशी क्षणात दिसून

क्षणात लपून जाशी क्षणात दिसून
जसे काही श्रावणाचे सोनसळी उन्ह

किती आलो दूर दूर तरिही अजून
वा-यावर वाहताहे तुझी तुझी धुन
पळतात ढग तुझा सांगावा घेऊन

शोधाया निघालो राणी असे एक गाव
पात्यापात्यावर जिथे दिसे तुझे नाव
जिथे तुझा गंध करी फुलांना तरुण
क्षणात लपून जाशी क्षणात दिसून

जाणवती आसपास कसे तुझे भास
वाटे आता थांबणार अवघा प्रवास
मनातली स्वप्ने सारी येतिल रुजून
क्षणात लपून जाशी क्षणात दिसून
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
राधे रंग तुझा गोरा,

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ?

राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने?
उधळले माधवानेकिंवा नुसत्या वारयाने?

राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?

राधे, कासाविशी अशी.. तरी 'वेडी' कशी म्हणू ?
तुझ्या रुपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू !

राधे, दृष्टीतून का ग घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी...तिथे मुरारी भिजला !!

डोळा पाणी.. जिणे उन्ह..इंद्रधनुचा सोहळा
पुसटले साती रंग...एक " श्रीरंग " उरला !!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
आता वाटतं

आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला
आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला
एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस
आता वाटतं - नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला
आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ,
कसे सचैल भिजायचो इतके दिवस - मजा वाटते आहे !
काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा
अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे ...
आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला
थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही
आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास
प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही !
भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो - क्षमा !
बहरून आला होतात त्या उद्यानांनो - क्षमा !
झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात
पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे !
पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो
यावर आता विश्वास ठेवायचा फक्त ...
हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे
थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं,
आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त !
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....

लगबग लगबग दार उघडशील अत अधिरशा ओढीने..
लगबग लगबग दार उघडशील अत अधिरशा ओढीने...
जरा पाणीया डोळ्याने अन्..जरा हासर्या चेह्रयाने....!
लगबग लगबग दार उघडशील अत अधिरशा ओढीने.

चेह्र्यवरति क्षमस्व घेउन दारी उभा मी थकलेला....
आणि तुझा चेहरा जणू की चन्द्र घनातुन लपलेला.....
सोळा साऱ्या कळा जागतील...सोळा साऱ्या कळा जागतील....
अवघ्या एका खोडीने......
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने..


किणण हलावा लोलक हलके..नेत्रान्मधला ओझरता...
पुन्हा राहशील दूर उभी तू पूर आतला ओसरता....
वेड लावुनी रुसशील म्हणशील......
"वाट पाहिली वेडीने..."
लगबग लगबग दार उघडशील आता अधिरशा ओढीने....

संदर्भांचे अर्धे गाणे आता व्हायचे घे पुरते...
ना रहायचे पुन्हा निमंत्रण गाव व्हायचे गजबजते...
सांधायाचा पुनःश्च सेतू...
जोडीने तडजोडीने.....
लगबग लगबग दार उघडशील अत अधिरशा ओढीने....

ऊन सावली मिठीत येईल...दिठित येईल जाग नवी..
जागी होईल तुझ्यात कविता...आणिक माझ्यातील कवी.....
गोष्ट सुरु ही रुष्ट परन्तु.....संपायची गोडीने.....
लगबग लगबग दार उघडशील अत अधिरशा ओढीने....
लगबग लगबग दार उघडशील अत अधिरशा ओढीने....
जरा पाणीया डोळ्याने अन्...जरा हासर्या चेह्रयाने.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
नको करू सखे असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई?
माज्या मरणाची उगा उठेल आवई!

कशासाठी घालायचे काजल डोळ्यात?
गर्द दोहावर रानी पसरेल रात!

मुखाला लखाकी अशी कशास द्यायची?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटित लपेटू नको काया धुंध फुन्द!
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध!

नको करू सखे असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार!

नको करू सखे! नको करू!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
करार

चल आता बोलुन घेउ.....बोलुन घेउ थोडं
सुकन्याआधी माती आणि जाण्याआधी तडे

संपत आलाय पाउसकाळ विरत चाललेत मेघ...
विजेचिहि पुर्वीसारखी उठ्त नाही रेघ....
मदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ
मोरपंखी पिसांनी ही....मिटण्याची वेळ
सावळ्या सावळ्या हवेत थोडं मिसळत चाललय ऊन..
खळखळणारी नदी आता वाहते जपुन जपुन

चल आता बोलुन घेउ.....बोलुन घेउ थोडं
लक्शात ठेव अर्थापेक्शा शब्दच असतात वेडे
मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट
लपले असतील बघ अजुन कुठे चुकार शब्द धीट
नजरा...आठवण....शपथा...सार्यांना ऊन द्यायला तर हवे
ओलावलेलं मन वाळायला तर हवं...

हळवी बिळवी होत पाहु नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्शा लक्श दे माझ्या बोलण्याकडे
भेटण्याआधी जेव्हा असते वेळ निश्चित जायचि
समजुतदार मुलासारखी तेव्हा खेळणी आवरुन घ्यायची
एकदम कर पाठ आणि मन कर कोरे
भेटलो ते हि बरे झाले .... चाललो ते हि बरे
मी ही घेतो आवरुन सारे तु ही सावरून जा
तळहाताच्या वळणावरच्या रेषांवरुन जा...
खुदा बिदा असलाच तर त्याला सोबत घे
"करार" पूर्ण झाला अशी सही तेवढी दे...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: संदीप खरेंच्या कवितांचं कलेक्शन

Sanmukh
किती झाले.. ?

किती झाले.. ?

रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घरच्या खाणाखूणा...
' हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ..
त्या मारुती पासून उजवीकडे वळा..
थोडी पुढे घ्या अजुन... पांढर्‍या गेटपाशी थांबवा...
हां... बास बास... इथेच... '
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत - ' हां... किती झाले ? '

८४ लक्ष तर झालेच की प्रीये !
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही !
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण
आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !!

आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चविने सरु दे अजुन एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त...
12