कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस!

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस!

Sanmukh
कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस!
रंगीबेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास!

आज बरयाच दिसांनी झाले मोकले आभाळ!
दूर तरले ढगांची शुभ्र मुलायम माळ!

किती दिसांनी पडले ऊन्ह पिवले धमक,
किरनांच्या वर्षावात न्हाते सावली सडक!

सुरू जाहली फिरून थांबलेली रहदारी,
पाय कराया मोकले मीही निघालो बाहेरी!

आणि पाहता सहज जरा मान वळवून,
कैफ जुनाच दाटला माझ्या नसांनसांतून!

तोच मोहक चेहरा त्यात गोड खळ्या गाली,
"आले भरून आभाळ पुन्हा वीज चमकली!"