दिवस हे जाती कसे..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

दिवस हे जाती कसे..

Sanmukh

दिवस हे जाती कसे अन ऋतू असे छळतात का?
विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का?

जवळ तू नाहीस ... उरली एकटी माझी मिठी,
चुकून तव निःश्वास गाली माझिया रुळतात का?

बिलगुनी बसली तुझी ही मधुरविव्हल चिंतने!
चांदण्या रात्री नकोशा टाळुनी टळतात का?

कुंद ह्या वेळी तुझ्याविण प्राण बघ मंदावला...
मग असे भवती अचानक दीप हे जळतात का?

जर तुझा एकांत केव्हा गुणगुणाया लागला,
शोध तू हृदयात ... माझी स्पंदने मिळतात का?