मग माझा जीव तुझ्या

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मग माझा जीव तुझ्या

Sanmukh

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल.

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर,
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल.

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व,
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल.

सहज कधी तू घरात लावशील सांजवात,
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल.

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल.

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल.

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद,
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल.