व्यक्ति नव्हेत.............वल्ली

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

व्यक्ति नव्हेत.............वल्ली

Nitinkharatmal
दिनांक: २२/०२/२०११

व्यक्ती तितक्या वल्ली - कारस्थानी डोके

व्यक्ति तितक्या वल्ली म्हणतात ते काही खोटे नाही, प्रत्येकाला आपली मते व्यक्त करण्याची मुभा असतेच पण काही व्यक्ती नव्हे वल्लीच म्हणाना एखाद्या व्यक्ति बद्दल आपली मते व्यक्त करताना त्याच्या समोर न करता त्याच्या पाठिमागे व्यक्त करतात. अशा प्रकारच्या व्यक्ती स्वत:ला फार हुशार समजत असतात. कारण दुसऱ्या व्यक्ती विषयी काहीही माहीती न घेता यांचा मेंदु डोक्यामधे सतत काहीतरी शिजवत असतोच. माझ्या मते या व्यक्ती स्वत: जशा असतात तशीच मते दुसऱ्या बद्दल स्वत:च्या मनात निर्माण करीत असतात आणी मग काय आपल्याला आवडणाऱ्या रंगाच्या चश्म्यातुन जर जग पाहीले तर त्याच रंगाचे दिसणार ना? खातरजमा या प्रकारच्या व्यक्तींच्या खिजगनतीत ही नसते. कटकारस्थाने हा या व्यक्तींचा आवडता खेळ, स्वत:ला ज्या गोष्टींचा फायदा नाही तर त्या गोष्टींचा इतरांना ही उपयोग होता कामा नये हे आवर्जुन पाहाण्या कडे या लोकांचा कल असतो. आपल्या मित्रमंडळींच्या मनातही या व्यक्ती गैरसमज पसरवीण्यात पटाईत असतात. अशा व्यक्ती हळुहळू आपल्या जवळच्या व्यक्तींपासुन दुरावू लागतात, कालांतराने स्वत:चे नुकसान आणी हसु करुन घेतात.

कार्यालयांमधे अशा व्यक्ती असल्याच तर खुप मोठया प्रमाणावर कार्यालयाचे नुकसान होण्याची शक्यता असते कारण दुसऱ्याची प्रगती हीच यांची पोटदुखी असते. स्वत: काही करायचं नाही, मेंदु कारस्थानात व्यस्त असल्याने स्वत:च्या कामात लक्ष लागत नाही, कामात सतत चुका, साहेबांची बोलणी या मुळे या व्यक्ती विचलीत होतात आणी स्वत:ला असुरक्षीत समजु लागतात आणी याच भावनेतुन इतरांबद्दल साहेबांचे कान भरणे अशा गोष्टी करु लागतात. हुशार साहेब अशा लोकांच्या खेळी त्वरीत ओळखतात, पण ज्यांना ओळखणे जमले नाही ते यांचे बोलणे ऐकुण इतर कर्मचाऱ्यांना दुषणे देतात आणी चांगल्या कर्मचाऱ्यांना दुरावतात व आपल्या कार्यालयाचे नुकसान करुन घेतात.

तर मित्रांनो आपल्यातील चांगल्या वाईट गुणांचे स्वत:च परिक्षण करुन पाहा, इतरांमधील चांगले गुण शोधुन त्यांचे कौतुक करायला शिका. सतत वाईटच शोधायला हवे का? कधीतरी इतरांबद्दल चांगला विचार करायला काय हरकत आहे?

नितीन खरटमल, पुणे
९५४५०८२१३८