युनिकोड वापरुन संगणकावर मराठीत लिहिण्याची सोय झाल्यामुळे ईंटरनेटवर बर्याच मराठी साईट्स, ब्लॉग्ज तयार झाले. अधिकाधिक ज्ञान व माहिती वाचकांसाठी उपलब्ध होऊ लागली आणि आता हा मराठी ज्ञानस्त्रोत अखंड वाढतच आहे. जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क असलेल्या फेसबुकने मराठी मनांना भुरळ घातली आणि सारे मराठी पक्षी फेसबुकच्या कट्ट्यावर जमा होऊ लागले. फेसबुकवर मराठी गप्पा रंगु लागल्या मात्र युनिकोड वापरुन मराठीत लिहिण्याची थेट सोय नसल्याने कधी देवनागरी लिपीत, कधी इंग्रजीत तर कधी इंग्रजी लिपीत लिहिलेल्या मराठीत :-)
मित्रहो, यापुढे फेसबुक (किंवा कोणत्याही साईटवर !) मराठीत लिहिण्याची एक उत्तम सोय उपलब्ध झाली आहे. आणि ही सेवा आपल्यासाठी आणली आहे गमभन (gamabhana) च्या ओंकार जोशी यांनी.
पुढे वाचा >>