|
दो नयनांचे हितगुज झाले तुला समजले मला उमजले क्षणभर गेले तेज लकाकुन अंतरातला कणकण उजळून गात्रागात्रांतुनी निथळले स्वप्नांनी आकार घेतला मौनांतुन हुंकार उमटला शब्दांना माधुर्य गवसले दोन मनांचे झाले मीलन खुले जीवनी नवीन दालन त्यात चांदणे धुंद पहुडले अंतर्यामी येत कोरिता मरणाला जे न ये चोरिता काही तरि जे जगावेगळे
--
Posted By Sushant to Marathi Songs, Marathi songs lyrics, Download marathi songs free, free marathi movie song on 2/15/2012 09:13:00 AM
|