khaltyal premachi khodkar kavita

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

khaltyal premachi khodkar kavita

Prathmesh Shirsat
खट्याळ प्रेमाची खोडकर कविता...

 
 
 
 
प्रित जडली तुझ्यावर, सुचले नाही काही
बघतच राहिलो तुझ्याकडे, इतर काही दिसलेच नाही
तुझ्या त्या अवखळ हसण्याचा, दिवाना कधी झालो कळलेच नाही
तुला रोज चोरुन बघायचो, तुलाही जाणवायचं की ते 
मलाच डोळा मारून तु ला़जून निघुन जायची, आणि माझ्या जिवाला घोर मात्र लावायची 
बरं तुला भेटायचं म्हटलं तर तुझे तिर्थरुप हातात काठी घेऊन माझ्याच मागे लागायचे
काही प्रेमाचे ४ शब्द तुझ्याशी बोलूया म्हटलं तर त्यांचा राकट हात माझ्या खांद्याव्रर जोरात आदळात बोलायचे"बोल बेटा बोल"
काय कपाळ बोलणार हाड खिळखिळी व्हायची माझी अजून पण हाडांतून आवाज येतात सांधे सरकले आहेत कदाचित 
पण माझ्या सासूबाई प्रेमळ होत्या मी घरी आलो की रोज काही ना काही खायला द्यायच्या मला
बिचार्‍यांना वाटायचं कधीतरी माझी मायनस फिगर प्लस मध्ये जाईल
माझ्या घरी उलंटं चित्र होतं, आई हातात हंटर घेऊन उभी असायची, जाम घाबरायचो तिला मी 
तिला बघितले की मला साक्षात रणचंडिका माता दिसायची, आणि तुझे बाबा हिटलर
माझ्या आईची गादी आता तू चालवते आहेस अगं लाजू नकोस मला रणचंडिका म्हणायचे आहे 
 तुझ्या साठी मी दिलेला गजरा तुझ्या आईचा डोक्यात का दिसायचा याचं कारणच सम्जत नव्हतं मला
नंतर कळलं की ही तुमच्या हिटलर साहेबांची कृपा मी तुला गजरा द्यायचो आणि तु तो फ्रिज मध्ये ठेवायची              
हिटलर साहेबांना वाटे किती छान मुलगी आहे आईसाठी गजरा आणते, आणि ते तुझ्या आईला सरप्राईज द्यायचे
आणि सासूबईंच्या डोक्यातला गजरा पाहून मी सरप्राईज व्हायचो, नक्की चाललय कय हेच नव्हतं कळत 
पुढे आपलं लग्न झालं, भर लग्न मंडपात तुझे बाबा आणि माझी आई असताना लोकं शुभेच्छा द्यायला पण घाबरायचे
आता हनिमून बद्दल जर लिहीलं तर ही कविता वाचणारी तमाम मंडळी गुलाबि दुनियेत हरवून जातील (आणि मी ही) 
त्या हनिमूनचा परिणाम जो व्हायचा होता तोच झाला, हम दो हमारे एक च्या काळात सुद्धा आपण दोघांनी हॅट्रीक केली
आणि आपल्याला तिळं झालं, आजोबा झाल्यावर, आपल्या मुलांनी हिटलरचा घोडा केला आणि तोही त्यांच्या साठी झाल बिचारा
तुझ्या आइच्या आणि माझ्या आइच्या हातची चव आजही तुझ्या हातला कधी येईल याचीच वाट बघत
डाळीतलं पाणी आणि आकार नसलेली चपाति गोड मानून खातोय मी      
रणचंडिका मातेचा रुद्रावतार आता शांत झाला आहे, ती आणि तुझी आई मिळून अजूनही महिलामंडळाचे उपद्व्याप घरात आणतात
मला आश्चर्य वाटतं ते महिलामंडळ अजूनही कसं काय शाबूत आहे, ते सुद्धा या दोघींमुळे 
असो चला काहीही म्हणा आपल्या प्रेमाची रेल्वेगाडी या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही
समुद्रातून भरधाव वेग घेत आकाशातून जात आहे हे काही कमी आहे 
संसारसुख म्हणजे काय ते आज कळलं मला तुझ्या मिठीत झोपलेलो असताना आपला धाकटा येतो आणि जोरात दार वाजवून म्हणतो
"बाबा, सुसु झाली आहे, टॉयलेट पर्यंत घेऊन चला ना तिकडे भूत आहे" अणि सगळ्या रंगाचा भंग करतो. 
आश्चर्य तेव्हा वाटतं मला जेव्हा तुझ्या गळ्यातला माझा हात काढून मला ढकलत बोलतेस,
" अहो रोमान्स गुरु जा बघा तुमचं कार्ट का बोंबलतं आहे ते"  म्हणजे माझं कारटं हिचं कोणीच नाही काय ??
तरीही तू मला आवडतेस कारण मी तुझ्यावर केलेल्या प्रेमाचा अपमान करणं मला पटत नाही.